फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा म्हणजे देशाचं बजेट ''बघण्याचा'' आठवडा. 24 फेब्रुवारीला ममतादीदींनी रेल्वे बजट सादर केलं. युपीए सरकारमध्ये मागीलवेळी लालु यादवांकडे असलेलं हे नफ्यातलं खातं, यंदाच्या युपीए हंगामात ममतादीदींकडे आलं. पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये निवडणूका आहेत त्यामुळे बंगालला रेल्वे बजेट मधे झुकतं माप असणार हे मिडियाने सर्वसामान्यांच्या मनावर चांगलच ठसवलं होतं, मात्र मी देशाची रेल्वे मंत्री आहे हे ममतादीदींनी त्यांच्या बजेटमधून दाखवून दिलं. महाराष्ट्राच्या वाट्यालातर ममतादीदींनी बंगाली मिठाई भरभरून दिली. सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना कुठलीही भाडेवाढ नकरता फार मोठा दिलासा दिलाय. तसच नेट सेव्ही झालेल्या प्रवाशांनाही ई-टिकीट बुकींगमध्ये 10 रुपयांची बचत दिली आहे. आणि मालवाहतूक भाडेवाढ ही नाही. असं एकंदर काही वाढीव न देता काही काढून घेतलं नाही हे समाधान मात्र दीदींनी भारतीयांना दिलयं. मराठवाड्याच्या तोंडाला नेहमीप्रमाणे पाने पुसली गेलीय. हे घीसंपीटं वाक्य मराठवाड्यातील नागरिकांसाठी यंदा पुन्हा कामी आलय. एकही नवी गाडी नाही. नवा रेल्वे मार्ग नाही. इलेक्ट्रीक लाईनचं स्वप्न केव्हा पुर्ण होणार हे रेल्वे मंत्रीच जाणो. तर असं हे एकंदर बजेट सगळ्या इलेक्ट्रॉनिक मिडियात वाजत असतांना क्रिकेट मधील विक्रमादित्य सचिन तेंडुलकर रन्सची रेल्वे सुसाट वेगाने पळवत होता. बजेटवरुन मिडिया सर्ररकन उतरलं आणि सचिनच्या विक्रमी द्विशतकाच्या खेळीकडे डोळे लावून बसलं. सर्वसामान्यांच्या जीवनात काडीचाही बदल न घडूनयेणा-या या घटनेकडे मिडियाने आपली सर्व शक्ती वळवली. सचिनचं द्विशतक ही क्रीडा - क्रिकेट जगतातील मोठी घटना हे कोणीही नाकारत नाही. मात्र हिंदी मराठी मिडियासाठी इंदूरच्या मॅच शिवाय आणि त्यातही सचिनच्या खेळी शिवाय जगात दुसरं काहीच घडत नाही असं का वाटावं ? या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. केवळ टी आर पी आहे म्हणून सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत प्रश्न बाजूला ठेवून एका खेळाच्या बातमीवरच खेळत बसायचं. हे सहन होण्यापलीकडचं आहे. यावेळी मला मकरंद अनासपूरेच्या गोष्ट छोटी डोंगरा एवढी सिनेमातला एक डायलॉग आठवतो, ''तो सचिन तिकडं आऊट झाला की तुमची तोंडं इथं बाप मेल्या सारखी पडतात, आणि बाप कामानं मरतोय त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही.'' हीच अवस्था शहर आणि ग्रामीण भागात झाली आहे. सचिनची खेळी , त्याचे तंत्रशुद्ध फटके, याही वयात टिकून असलेला स्टामिना , या सगळ्यांचे कौतूक व्हायलाच हवे. त्याला भारतरत्नही मिळावा. याबद्दल कुठलच दुमत नाही. मात्र मिडियाने खेळ आणि इतर बातम्यात कशाला किती महत्त्व द्यायचे हे ठरवायला हवे.
शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा