आज रात्री मस्त पैकी घरावर जाऊन थंडीत - गार हवेत सिगरेट ओढत कोक प्यावा वाटत आहे... घरी जाई पर्यंत दुकानं उघडी राहीली तर मनातला बेत नक्की पूर्ण करणार... वर्ष संपायला एकच दिवस उरला आहे आणि मला सुटी देखील आहे, त्यामुळे रात्री कितीही वेळ जागरण केले तरी उद्या वेळेवर उठण्याचे कंपल्शन नाही. हे काय सांगत बसलो असे जर वाटत असेल तर, मनातलं सांगण्यासाठीच तर ब्लॉग असतो. इथं नाही व्यक्त व्हायचं तर मग काय तयखाण्यात... आज 'जयभीम' या घोषणेला 75 वर्ष पूर्ण झाली. मराठवाड्याचे सुपूत्र भाऊसाहेब मोरे यांनी ३० डिसेंबर १९३८ साली तत्कालिन निजाम राजवटीच्या सीमेवरील गावात - कन्नड तालुक्यातील मक्रणपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सभा आयोजित केली होती. ही सभा निजाम राजवटीविरोधात आणि दलित, शोषित, शेतमजुरांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. त्या काळात मराठवाड्यातील दलितांचे जोरजबरदस्तीने धर्मांतर केले जात होते. त्यांना मुसलमान केले जात होते. या सर्वांच्या विरोधात सुशिक्षीत भाऊसाहेब मोरे यांनी बाबासाहेबांच्या उपस्थितीत परिषदेचे आयोजन केले होते. भाऊसाहेब तेव्हा शेड्युल्ड कास्ट फेड...