मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

किती ही मळमळ

रिमझिम पावसात दोघं शांत चाललेले असतात. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांनी धरलेला अडोसा एका वळणावर थांबतो. रिमझिम पावसांच्या सरीने दोघेही नक्षिकांत चिंब झालेले. तो हातातील वह्या पुस्तकं डोक्यावर धरून तर ती ओढणी डोक्यावर व्यवस्थीत करत हातात असलेलं 'एनहिलेशन ऑफ कास्ट' डोक्यावर धरून झपझप पावलं उचलायला लागते. रिमझिम पावसात एकमेकांसोबत चालून आता 15-20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ झालेला असतो पण तिच्या तोंडातून चकार शब्द निघालेला नाही. आता त्याच्या तगमग अधिकच वाढलेली... ही का बोलत नसेल. कशाचा राग.. की कोणासोबत बिनसलं आज... की आपल्याकडूनच एखादा वेडावाकडा शब्द निघाला असेल... एक ना दोन तो दिवसभरातील सगळ्या घटना आठवायला लागतो... अखेर पाऊस थांबतो आणि त्याच्या ओठांना शब्द फुटतात... सखे... काय झाले काय नेमके. का एवढी शांत आहे. वाटलं होत पावसामुळं थिजले असतील तुझे शब्द... पण जरा वेगळच प्रकरण दिसतयं... कोणासोबत काही बिनसलं का? की माझचं... काही चुकलयं... नाही रे... तुझं काही नाही चुकलं आणि तुझं चुकलं असतं तर एवढं शांत राहून सोडलं असत का तुला! आपलं काही चुकलं नाही हे कळाल्यावर त्या भोळ्या सांबाला ...

मुख्यमंत्री साहेब तुम्ही सुद्धा...

गाय हा राष्ट्रीय प्राणी घोषित करावा, असा सल्ला काही दिवसांपूर्वी राजस्थान हायकोर्टातून निवृत्त होणाऱ्या न्यायाधिशांनी दिला होता. त्यावर राष्ट्रीय स्तरावर बरीच चर्चा झाली. गुजरातमध्ये गोरक्षणाच्या नावावर वाढत चाललेला हिंसाचारही चिंतेचा विषय बनला आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी गुजरात दौऱ्यावर असताना गायीच्या नावाखाली माणसांना मारणे योग्य नसल्याचे सांगितले. उत्तर प्रदेशात योगी सरकार आल्यापासून 'गाय' हा विषय अधिक संवेदनशील झाला आहे. नुकताच एक अहवाल आला होता त्यात महाराष्ट्रात गोरक्षणाच्या नावाने गुजरात आणि उत्तर प्रदेश एवढा हिंसाचार नसल्याचे म्हटले होते. हे कदाचित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोचले की काय? आपण कसे काय मागे राहिलो याचे त्यांना दुःख झाले असावे म्हणूनच फडणवीसांच्या वाणीतूनही आता गायीचे गोडवे निघाले आहेत. तेही गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या उपस्थितीत. काय म्हणाले मुख्यमंत्री  - जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'ज्या ठिकाणी गायींची संख्या कमी झाली आहे त...

मोदी-शहा जोडींने का निवडले रामनाथ कोविंद यांना

मोदी-शहा जोडीचा खेळ खरच अगम्य आहे. कोणाच्याही ध्यानी मनी नसलेले नाव त्यांनी राष्ट्रपती पदासाठी पुढे केले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन आणि शिवसेनेने पुढे केलेले मोहन भागवत, डॉ. एम.एस स्वामिनाथन या सर्वांना बाजूला करत शहांनी पत्रकार परिषदेत रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली. एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून उत्तर प्रदेशचे दलित व्यक्ती, एकेकाळी आएएएस परीक्षा उत्तीर्ण परंतू वकिलीचाच पेशा कायम ठेवणारे भाजपच्या दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष, दोनवेळा राज्यसभा सदस्य आणि सध्या बिहारचे राज्यपाल असलेल्या कोविंद यांचे नाव पुढे करुन मोदी-शहा जोडीने सर्वांचीच (विरोधकांची) पंचायत करुन टाकली आहे. मोदी आणि शहा हे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात 2020, 2022 मध्ये हे साध्य होईल किंवा हे ध्येय गाठले जाईल असे सांगतात तेव्हा विरोधक त्यांची खिल्ली उडवतात. अजून 2019 बाकी आहे. मात्र या जोडीने 2019 ची तयारी ही किती आधीपासून केली याची प्रचिती त्यांच्या प्रत्येक निर्णयातून विरोधकांना यायला हवी. 2019 मध्ये उत्तर प्रदेशातील संपूर्ण दलितांची मते ही भाजपच्या पारड्यात पडण्यास...

योगीसाठी शहीदाच्या घरी लावला एसी, दानवेंच्या दारी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'

शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...

देवसेना आणि आर्ची

#सखे... देवसेनाच्या एँट्रीला तू दिलेली दाद वाह.. खरचं.. तिथचं सगळं मिळालं... अशीच दाद तू सैराटच्या अर्चीने बुलेटवर घेतलेल्या एंट्रीला दिली होती.. आठवत असेल तूला.. आजही तुझ्या चेहऱ्यावर तेच भाव होते आणि योगायोग ही कसा देवसेनाही तशीच करारी... बाहुबली-2 पाहाताना प्रत्येकवेळी तुझ्या चेहऱ्यावरील हावभाव बदलत होते... #सखे तसा हा तुझ्या जॉनरचा चित्रपट नव्हता.. तुझे लक्ष मात्र देवसेना-शिवगामीच्या साड्यांवर खिळलेले... आता या नावाने शाहगंज-टिळकपथच्या बाजारात साड्या येतील हे सांगण्यासही तू विसरली नाही... #सखे तूला चित्रपटांचे किती हे वेड... तरीही थेअटरमधून बाहेर पडल्यानंतर म्हणाली, 'त्या कोळाखातील दुनिया बाहेरच्या कडक उन्हातही कुठे दिसत नाही... किती कल्पनेत घेऊन जातात हे रुपेरी जगातील माणसं आपल्याला...' 

मंगल प्रभात लोढा यांनाच फाळणीच्या प्रतीकाची एवढी शीरशीरी का यावी ?

अण्णाभाऊ साठेंनी मुंबईचे यथार्थ वर्णन त्यांच्या 'मुंबईची लावणी'मध्ये केले आहे. पहिल्या दोन ओळीतच त्यांनी मलबार हिलचा उल्लेख केला, तो असा... 'मुंबईत उंचावरी । मलबार हिल इंद्रपुरी । कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती ।।' अशा कुबेरांच्या वस्तीचे लोकप्रतिनिधी आहेत भाजपचे मंगल प्रभात लोढा. त्यांनी याच मलबार हिलमधील जीना हाऊस जमीनदोस्त करण्याची मागणी केली आहे. त्या ठिकाणी सांस्कृतिक केंद्र उभारण्याची त्यांनी केलेली मागणी कोणत्याही व्यक्तीला रास्तच वाटू शकते. त्यातही सध्याच्या 'देशद्रोही' आणि 'देशभक्त' या व्याख्येत त्यांची मागणी सहाजिकच देशप्रेमाचे भरते आणणारीच आहे.  त्यांच्या या मागणीने काही प्रश्नही निर्माण झाले आहे. मंगल प्रभात लोढा यांनाच फाळणीच्या प्रतीकाची एवढी शीरशीरी का यावी ?  - 'जीना हाऊस' ज्या भागात आहे तो मलबार हिल परिसर लोढांचा विधानसभा मतदारसंघ आहे. 1995 मध्ये ते येथून प्रथम आमदार झाले. - मुख्यमंत्र्यांचा बंगला 'वर्षा' देखील मलबार हिलमध्ये आहे. 'वर्षा' समोरच अडीच एकरातील परिसरात 'जीना हाऊस' आहे. - लोढा...

यूपी में रहान है तो योगी - योगी कहना है

उत्तर प्रदेशमध्ये भाजपला जे अभूतपूर्व यश मिळाले त्यावर काय बोलावे हेच सुचत नव्हते. विजय हा विजय असतो त्याला दुसरे काहीही नाव नाही असे तेव्हा म्हणावसे वाटले होते. मात्र जेव्हा या विजयाचा बारकाईने विचार करत गेलो तेव्हा लक्षात येऊ लागले की भाजपने केवळ विजयी उमेदवारांचीच निवड केली नाही तर त्यांनी आपला मतदार शाबूत ठेवून विरोधकांची मते फोडणारे उमेदवार निवडले होते. महाराष्ट्रात ज्या प्रमाणे मराठा राजकारणाला वैतागलेल्या ओबीसींना जवळ केले तसेच यादवांना हात न लावता गैर-यादवांना शहांनी आपल्याकडे आणले. मायावतींचा जाटव मतबँकेवर लक्षकेंद्रीत न करता गैर-जाटव मतदारांना टार्गेट केले. त्यासोबत आदित्यनाथ योगी सारख्यांचे लाड करण्यात कुठलाही कसूर केला नाही.  "यूपी में रहान है तो योगी - योगी कहना है"  भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा आता समोर येत आहे. पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशात विरोधकांवर आरोप करताना ते 'कुछ का साथ आणि कुछ का विकास' करत असल्याची मल्लीनाथी केली होती. या देशात हिंदू बहुसंख्य आहेत, हे कोणीच नाकारत नाही. मात्र या देशाचे राजकारण हे सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहे. भाजप...

हिंसाचाराचे समर्थन करण्यापूर्वी एकदा तरी विचार करा...

पंतप्रधान देशातील दोन समाजामधील भेद ठळक होईल असे विधान भरसभेत करतात. त्यांचा उद्देश स्पष्ट असतो की बहुसंख्य समाजाचे एकगठ्ठा मतदान भाजपला झाले पाहिजे. त्यामुळेच कदाचित त्यांच्या पक्षाने देशातील सर्वात मोठ्या राज्यात एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही. उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथील जाहीर सभेत कबरस्थान आणि स्मशानाचा उल्लेख करुन मोदींनी प्रचाराची पातळी शेवटच्या टोकाला नेऊन ठेवली. 18 फेब्रुवारीला झालेल्या या सभेत मोदींनी मुस्लिमांच्या कबरस्थानला जशा सोयी-सुविधा देता तशाच हिंदूंच्या स्मशानाला देत चला, असे अखिलेश यादवांना सुनावले. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी रमजान आणि दिवाळीही यूपीच्या डावात मांडली. वाराणसीत रमजानमध्ये वीजपुरवठा केला जातो मात्र दिवाळीत अंधार असतो असे मोदी म्हणाले. अखिलेश यांनी लागलीच मोदींचे आरोप फेटाळून लावले. एकदा स्वतःच्या मतदारसंघात जाऊन विचारा दिवाळीत अंधार असतो का, असा टोला त्यांनी लगावला. मात्र पंतप्रधान पदावरील व्यक्तीने स्मशान-कबरस्थान-रमजान-दिवाळी हे निवडणुकीच्या राजकारणाचे विषय करणे खेदजनक आहे. त्यांच्या या वक्तव्याने त्यांच्या पक्षातील आग ओकणाऱ्या नेत्या...