मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2015 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मोदी अजून हरले नाही

बिहार ही देशासाठी 2014 च्या लोकसभेनंतरची सर्वात मोठी निवडणूक होती. मोदींच्या पंतप्रधानपदाला विरोध करणारे नितीशकुमार येथे लढणार होते. मागील विधानसभेत सुपडा साफ झालेल्या लालू प्रसाद यादवांच्या अस्तित्वाची ही लढाई होती तर काँग्रेसला अजून आपण जिंवत आहोत हे दाखवायेचे होते. (काँग्रेसबद्दल बोललो नसतो तरी हे वाक्य पूर्ण झाले असते.)  हे झाले मोदी आणि भाजप विरोधकांचे. पण गेल्या 18 महिन्यात आपण काय दिवे लावेल, हे सांगत नरेंद्र मोदींना पंतप्रधानपद पणाला लावायला लावणारी ही निवडणूक होती. निवडणूक व्यवस्थापनाचे चाणक्य ज्यांना भाजपने म्हणण्यास सुरुवात केली होती, आणि त्यांच्या सूरात सूर मिसळत भारतीय माध्यमांनीही तशीच री ओढली होती, त्या दाढीवाल्या चाणक्याची बिहारच्या जनतेने बिनपाण्याची केली. या निकालानंतर मला एकदा तरी बिहार पाहून यावा असे मनोमन वाटत आहे. पाच टप्प्यात बिहारची निवडणूक झाली आणि प्रत्येक टप्प्यात निवडणूक प्रचाराचा मुद्दा बदलेला होता. महाराष्ट्रात जसे विदर्भात गेले की कास्तकरी, शेतकरी आत्महत्या. पश्चिम महाराष्ट्रात उसाला भाव, साखर कारखाने, उद्योग, सहकार. कोकणात रेल्वे, आंबा-काजू निर्या...

नेते हवेत मुद्दे जमीनीवर, बिहारमध्ये पंतप्रधानांपासून सर्वांचेच ताळतंत्र सुटले

बिहार विधानसभा निवडणूक ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १६ महिन्यांच्या कामाची परीक्षा आहे. त्यांनी त्यांची सर्व शक्ती तिथे पणाला लावली आहे. त्यासाठी ते काहीही करायला तयार आहेत.त्याचमुळे त्यांचे बोलण्याचे ताळतंत्र सुटले आहे. याचे दुषण भाजप समोरच्या महाआघाडीतील जेडीयू-आरजेडी-काँग्रेसला देईलही . पण जनतेला हे कळणार नाही असे केंद्रातील आणि राज्यातील दोन्ही मोदींना कसे कळत नाही याचेच नवल वाटते. बस्तरच्या सभेत तर पंतप्रधानांनी थेट नितीशकुमार आणि लालू यादवांना आव्हानच केले की तुमच्याकडे जेवढ्या शिव्या असतील तेवढ्या आता देऊन टाका, शेवटचे सात-आठ दिवसच शिल्लक राहिले आहे. आज बिहार विधानसेभेच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे.  त्यानिमीत्ताने एक दिवस आधीच मी दिव्य मराठी वेब साईटसाठी (divyamarathi.com) आतापर्यंतच्या प्रचारावर माझे मत मांडले होते. त्यात विकासापासून सुरु झालेली चर्चा आता शिवीगाळीवर आणि तंत्र-मंत्रात अडकल्याचे मांडले आहे. आज बिहारमध्ये ५० जगांसाठी मतदान होत आहे. त्यानिमीत्ताने वेबसाईटसाठीेचे विश्लेषण पुन्हा एकदा माझ्या BLOG वर पुनर्प्रकाशित करीत आहे.   नेते हवेत मुद्दे ...

'पुरस्कार वापसी'

माझे एक गुरुवर्य  म्हणाले, सदानंद मोरे यांनी त्यांचा पुरस्कार 'इंद्रायणीत बुडवला' असता तर सनातन्यांवर किती मोठा सूड उगवला असता...  खरं आहे हे. तुकारामाचे वंशज सांगताना यांचा ऊर फुटेस्तोवर फुलून येतो पण तुकारामासारखे एक पाऊल टाकायचे झाले तर... असो... त्यांचा पुरस्कार-अध्यक्षपद त्यांना लखलाभ. साहित्यिकांनी पुरस्कार परत केल्याने गेंड्याच्या कातडीच्या लोकांना काही फरक पडणार आहे का ? तर नक्कीच नाही, असे याचे उत्तर असू शकत नाही. हा प्रतिकात्मक विरोध आहे. साहित्यिकांनी त्यांचा निषेध कसा नोंदवावा हा त्यांचा अधिकार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षांपासून चालत आलेल्या रुढी-बंधनातून मागास समाजाची मुक्ती करण्यासाठी मनुस्मृती दहन केले होते. हे देखील प्रतिकात्मकच आंदोलन होते. एक मनुस्मृती जाळल्याने सनातन्यांची मानसिकता बदलली का ? पण त्यावर घाव घातला गेला. समजातील बुद्धीवंतांना असे घाव वेळोवेळी घालावे लागत आले आहेत. तेच काम आजच्या केंद्रातील सरकारविरोधात आणि देश पोखरून काढणाऱ्या त्यांच्या भाऊबंदांविरोधात साहित्यिकांनी सुरु केले आहे. त्याचे स्वागत झाले पाहिजे. 'पुरस्कार ...

उजेडाची फुलं कोण जपणार ?

तुम्ही एक दिवस घरी उशिरा जाणार असाल तर बायकोचे नाहीतर आईचे पाच-दहा फोन येऊन गेलेले असतात. केव्हा येशील.  कुठे आहेस. किती वेळ लागले. कोणासोबत आहे. यापेक्षा  काही वेगळे प्रश्न तुमच्या कुटुंबियांच्या मनात येत नसतील. पण तो आता तुरुंगाचाच होऊन गेला आहे. त्याच्या दीड वर्षाच्या मुलाने सात महिन्यापूर्वी आपल्या बापाला पाहिले होते जाळीपलिकडे. त्या पोराला आपल्या बापाच्या खांद्यावर बसून गावभर फिरावं वाटलं नसेल का?  त्याच्या आई-बापाच्या दुखण्यात त्यांना वाटलं  नसेल का, की लेक असता तर दहा ठिकाणी घेऊन गेला असता आपल्याला. त्या क्रांतिकारी भगिनीच्या अंर्तमनाची घालमेल वेगळी  सांगायची काय गरज आहे. तिच्या मनात क्रांतीची आग आहे आणि ओठावर नक्षलवादी असल्याच्या संशयाने तुरुंगात टाकलेला नवरा - जीवनसाथी सचिन माळीचे गीत आहे. शीतल साठे आणि सचिन माळी यांना नक्षलवादी असल्याच्या संशयाने महाराष्ट्राची एटीएस शोधत होते. यांचा गुन्हा काय तर बुद्ध-फुले-शाहू-बाबासाहेबांची गीतं लिहातात आणि म्हणतात.  दोघांनीही 2013 मध्ये मंत्रालयासमोर स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. कारण काय तर आम्ही नक्...

BHAi UNMESH: भारत किती स्वच्छ

BHAi UNMESH: भारत किती स्वच्छ : >> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

पोलिसांच्या किस्स्यांचा औरंगाबादमध्ये बोलबाला

औरंगाबाद - शहरात नवीन प्रशासकीय किंवा पोलिस अधिकारी आल्यानंतर नव्याचे नऊ दिवस चर्चा होत असते. मात्र औरंगाबाद पोलिस आयुक्त म्हणून अमितेशकुमार रुजू झाल्यापासून केवळ अधिकारी आणि पोलिस खात्यातच त्यांची चर्चा नाही तर, शहरातील प्रत्येक चौकात, नाक्यावर, पानटपरी आणि एवढेच नाही तर ऑफिसमधील लंच टेबलवरही पोलिसांच्या कामगिरीबद्दल बोलले जात आहे. सर्व सामान्य नागरिकाला पोलिसांचा कायम धाक असतो. पण, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आणि सत्ता व पैशांचे बळ ज्यांच्या पाठीशी असते त्यांना कोणीच आपले काही बिघडवू शकत नाही असा समज असतो. तो गैरसमज असल्याची उदाहरणे सध्या शहरात पाहायला मिळत असल्याबद्दल नागरिकांमध्ये चर्चा आहे. रस्त्यावरुन डोक्याला काळा कपडा बांधून फिरणारे (चार्ली) पोलिस तर कुतूहलाचा विषय झाले आहेत. कुठे काही चुकीचे दिसत असेल तर हे चार्ली पथक तत्काळ हस्तक्षेप करत प्रकरण वाढण्याला वेळीच रोखत आहे. भर वस्तीत गांजा कुठे मिळतो, विचारणारा कोण ? शाळा सुटायला वेळ होता, तेव्हा काही पालक घोळक्या घोळक्याने गप्पा मारत उभे होते. त्यात एक माजी नगरसेवक आले, गप्पांमध्ये सहभागी झाले. बोलण्याच...

लोकशाही जिंकली आणि मोदी हारले

देशात लोकशाही आहे हे आज पुन्हा एकदा राज्यसभेच्या माध्यमातून सिद्ध झाले आले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना देशाचे भाषणबाज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधीपक्षाच्या सदस्यांना अनेक टोमणे मारले आणि तुम्हाला 'ऐकावेच लागेल' हे एक नव्हे तर तीन वेळा म्हटले. तेव्हा त्यांचा बोलण्याचा टोन हा स्वतःच्या नावाचा सुट घालणार्‍या एका देशाच्या राजासारखा होता. त्यामुळेच विरोधीपक्षातील सदस्य नाराज झाले आणि त्यांनी सरकारला जमीनीवर आणले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचूरी यांनी काळ्या धनावर सरकार अपयशी झाल्याचे राष्ट्रपतींच्या भाषणात संशोधन करावे हा प्रस्ताव आणला होता. पंतप्रधानांच्या भाषणानंतर तो मागे घेण्यास त्यांनी नकार दिला. त्यावर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी त्यांना परत-परत विचारले, तुम्हाला प्रस्ताव मतविभाजनासाठी ठेवायचा आहे??? त्यावर येचूरी यांनी होय असे सांगितले आणि सरकारचा राज्यसभेत धन्यवाद प्रस्तावावर 118 विरुद्ध 57 असा लाजीरवाणा पराभव झाला. वास्तविक वरिष्ठ सभागृहात सरकारचे 72 सदस्य आहेत. मात...

दिल्ली विधानसभा : आयात उमेदवार आणि नकारात्मकतेचा भाजपला फटका

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीने विक्रमी (७० पैकी ६७) विजय मिळविला आहे. त्यांच्या विजयाने भाजपचा (७० पैकी ०३) आणि एका अर्थाने मोदींचा अश्वमेध रोखला गेला आहे. एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या दिल्लीत भाजपला केवळ तीन जागांवर रोखून त्यांच्या गेल्या नऊ महिन्यांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सत्ता-पैसा-जात-धर्म आणि नकारात्मकता यांच्यापलिकडे मतदार विचार करतात याचा भाजपला नऊ महिन्यात विसर पडला होता. सर्वसामान्यांच्या हिताऐवजी नकारात्मक राजकारणावर स्वार होऊन विजय मिळविता येईल याला भाजप बळी पडली. दुसरीकडे पॅरेशूट उमेदवार किरण बेदी यांना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार करुन स्वपक्षीयांचा रोष ओढवून घेतला, त्याचाच परिणाम त्यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत भोगावा लागला. भाजपमध्ये अंतर्गत लोकशाहीची गरज राजकीय विश्लेषक डॉ. सुधीर गव्हाणे यांच्या मतानुसार, सध्याच्या राजकारणात वचनांची आणि आश्वासनांची परिपूर्ती करणे राजकीय पक्षांसाठी अत्यंत गरजेचे आहे. सत्ता मिळविण्यासाठी जनतेच्या आकांक्षा जागवणे वेगळी गोष्ट आहे आणि त्याची परिपूर्ती करणे वेगळी बाब...

औरंगाबाद मनपा निवडणुकीचा बाजार रंगणार, आपण २२ जागा तरी जिंकणार का?

लोकसभा-विधानसभेनंतर औरंगाबादकरांसाठी महत्त्वाची निवडणूक आली. रोजच्या जगण्याच्या लढाईचे प्रश्न (जन्म-मृत्यू नोंदीपासून रस्ते, पाणी, स्वच्छता आणि बरेच काही )जेथून सुटले पाहिजे त्या पालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. वार्ड आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची आणि मतदारांची फोनाफोनी सुरु झाली आहे. आता औरंगाबाद महानगर पालिकेच्या निवडणुकीची रंगत पाहाण्यासारखी राहाणार आहे. वार्डांची संख्या वाढून ११३ वर गेली आहे. ११३ वार्ड झाल्यानंतरही अनेक दिग्गजांची निवडणूक लढण्याची आणि लढले तरी जिंकण्याची संधी हुकली आहे. त्याचे कारण म्हणजे वार्ड आरक्षणाने या दिग्गजांचा  पत्ता कापला आहे. त्यामुळे अनेक नवे चेहरे पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे. भाजपची (एनडीए) केंद्रात तर भाजप-सेनेची राज्यात सत्ता आहे. औरंगाबादला युती होते की नाही हे अजून ठरायचे आहे. काँग्रेसचे नेहमीप्रमाणेच गोलमाल वातावरण तर, राष्ट्रवादी किती जोर लावते हे पाहाणे औत्सूक्याचे ठरणार आहे. औरंगाबादमधूनच महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केलेला 'एमआयएम' हा फॅक्टर किती प्रभावी ठरतो याकडे केवळ औरंगाबाद आणि मराठवाड्याचे नाही तर महाराष्...

दुखणं

माणूस म्हणून जगत असताना अनेक चांगल्या गोष्टी - घटना लक्ष वेधून घेत असतात, त्याच बरोबर मनाला न पटणार्या घटना बेचैन करत असतात.  गेल्या आठवड्यात उजव्या हाताच्या आंगठ्याची योग्य हलचल होत नाही म्हणून छोटे अॉपरेशन झाले, त्यामुळे घरात पडून आहे.  याच दरम्यान ओबामा भारतात येऊन गेले - दिल्लीत निवडणूक दंगलीला रंग चढत आहे - राज्यात शेतकरी आत्महत्या सूरुच आहे -  तसेच विवेकानंद यांच्या धार्मिक विचारांवर पुरोगामी आणि प्रतिगामी यांच्यात अदृष्य चकमक सूरू आहे - भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेतील दोन शब्द गायब करण्यात आले- मोदीने जोधपुरी सूटवर स्वतःचे नाव लिहून घेतले - गल्लीपासून दिल्ली पर्यंत असे काही घडत असताना मला "मोकल्या हाताने " लिहिता येत नसल्याचे वाइट वाटते.  😴       श्टी

भूमिका

नवीन वर्ष आले की, नित्य नियमाने मी व्यायाम करण्याचा संकल्प करतो. त्याला निसर्गही तेवढीच साथ देतो. जानेवारीमध्ये बोचर्‍या थंडीचे दिवस असतात त्यामुळे हिवाळ्यामध्ये हा संकल्प प्रत्यक्षात उतरवणे अंगी लागते. मात्र, पंधरा-वीस दिवसांनी संक्रांत येते आणि हिवाळा कमी-कमी होऊ लागतो तसा माझा उत्साह देखील मावळतो. संकल्पावरच संक्रांत येते. मग व्यायामाचा संकल्प केला होता हे देखील विसरायला होते. असो. हा झाला १ जानेवारी २०१५ पर्यंतचा इतिहास. यावर्षी संकल्प म्हणून नाही तर, मी स्वतःसाठी काही लिहू इच्छित आहे. माध्यमाच्या जगात काम करत असताना आपला स्वतःचा काही दृष्टीकोण असला पाहिजे. स्वतःचे असे काही मत असले पाहिजे. स्वतःची काही भूमिका असली पाहिजे, असे अनेक दिवसांपासून मनात घोळत होते.  रस्त्याने चालताना अनेक गोष्टी दिसतात त्या बातमीत मांडणे शक्य होत नाही.  नवीन वर्षाच्या निमीत्ताने मनातील या विचारांना मुर्तरुप देण्याचे निश्चित केले आहे. मित्रांसोबतच्या चर्चेत, फेसबुक - ट्विटर या सोशल साइट्सवर आणि ब्लॉगवरही मी माझी काही मते मांडत असतो. पण, त्यात एकसंधपणा नसतो. एकसुत्रता नसते. त्यामुळे चर्चेच्या...