मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2009 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली !

6 डिसेंबर हा दिवस महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम दलित जनता कधीच विसरू शकणारी नाही. याच दिवशी सर्व दलित, पिडित, तळागळातील समाजाचे उध्दारकर्ते भारतरत्न बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. या घटनेला उद्या 53 वर्ष होतील. या 53 वर्षात प्रामुख्याने महाराष्ट्रातील दलित चळवळ ही आंबेडकरी चळवळ म्हणून नावारुपास आली. बाबासाहेबांनतर कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी चळवळीला एका विशिष्ट टप्प्यावर नेऊन ठेवले. मात्र त्यांच्यानंतरच्या पिढीने रिपब्लिकन पक्ष आणि दलित चळवळ बौध्दांपूरती मर्यादीत करुन टाकली. आजच्या रिपब्लिकन नेत्यांनीतर आपापल्या वाट्याहिश्याला येईल तेवढे काखोटीला मारण्याचा एकमेव कार्यक्रम केलेला आहे. त्यात कोणी खासदारकी तर कोणी राज्यपालपदाची येस्करकी मिळवण्यातच धन्यता मानलेली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत प्रमुख रिपाई नेते रामदास आठवले, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, टी.एम. कांबळे, यांचे संसदीय राजकारण संपुष्टात आल्यातच जमा आहे. यातील एकही जण खासदार होऊन देशाच्या संसदेत तर गेलेच नाही मात्र बाळासाहेब आंबेडकर वगळता महाराष्ट्रातही एक आमद...

(अ)सत्यबाबाची पूजा

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक संपली. काँग्रेस - राष्ट्रवादीला अनपेक्षित बहूमत मिळले. आणि पुन्हा एकदा शंकरराव चव्हाण पुत्र अशोक चव्हाणांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. अशोक चव्हाण विक्रमी मताधिक्याने निवडून आले. हे सगळं यश मुख्यमंत्र्यांना लोकशाहीतील मतदारराजा आणि काँग्रेसश्रेष्ठींच्या कृपादृष्टीमुळे मिळालेले आहे, हे महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान न केलेला एखादा पोरही सांगू शकेल. मात्र चव्हाणांचा विश्वास लोकशाहीतील 'देवा' पेक्षा देव-देव करणा-या बाबावरच जास्त असल्याचे रविवारी महाराष्ट्रदेशाने पाहिले. राजकारणी कुडमुड्या जोतिषा पासून 'जागृत' देवस्थानाचे निस्सीम भक्त असतात. हे ही सर्वश्रुत आहे. डाव्या चळवळीतील - पुरोगामी म्हणविणारेही बरेच जण चोरुन लपून देवदर्शन घेऊन येतात. मुलाबाळांच्या लग्न पत्रिकांवर याच्या त्याच्या कृपेनं छापतात. वेगवेगळ्या नावाने भंडारा, कंदूरी, न्याज च्या पंगती उठवतात. मात्र काल मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी शासकीय निवासस्थानी , शासकीय खर्चाने , सुटीच्या दिवशी शासनाचे कर्मचारी राबवले ते सत्यसाईबाबाची पाद्यपूजा करण्यासाठी. उठता बसता पुरोगामीत्वाची ट...

दस-याच्या निमीत्ताने...

विजयादशमी. दसरा. हे शब्द कानावर येताच आठवतात. सोनं म्हणून एकमेकांनी दिली जाणारी आपट्याची पानं. आप्त नातेवाईकांचे घेतलेलं दर्शन. संध्याकाळी रामलीला मैदानावर भरगच्च गर्दीत बघीतलेलं रावण दहन. यासगळ्या माझ्या औरंगाबादच्या बालपणीच्या आठवणी. यंदाचा माझा दसरा... विजयादशमी... धम्मचक्र प्रवर्तन दिन हा मुंबईत असणार आहे. उद्यावर येवून ठेपलेल्या या सणाचं मला इथं जराही अप्रुप नाही. हिंदू मायथालॉजीत दसरा किंवा दशहरा , विजयादशमीला वेगवेगळे अर्थ आहेत. आणि त्या अर्थानं यंदाचा दसरा राजकीयदृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. शस्त्रास्त्रांची पुजा करुन नवीन भूमी जिंकण्यासाठी पुर्वी सीमोल्लंघन या दिवशी केलं जात होतं. समाजातील आसुरी प्रवृत्तींवर शौर्यानं विजय मिळवून हा विजय साजरा करणं हे ह्या दिवसाचं महत्वं. याच दसरा दिवाळीच्या काळात यंदा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका आल्या आणि राजकीय पटलावरचं सीमोल्लंघन उभा महाराष्ट्र देश पाहणार आहे. आज म्हणजे दस-याच्या पुर्वसंध्येला राज ठाकरेंनी विधानसेभेच्या प्रचाराचा शुभारंभ मुंबईतील भांडूप येथून केला. तर काँग्रेस - राष्ट्रवादी यांच्या प्रचाराचा नारळ शरद पवारांनी सुशी...

तुझेच धम्मचक्र फिरे जगावरी...

अशोक विजयादशमी आणि ५3 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा! आज ५3 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पावन दिवशी सर्व मित्र, बंधू आणि भगिनींना माझ्या हार्दिक शुभेच्छा ! सम्राट अशोकाने विजयादशमीच्या दिवशी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारा साठी आपले जीवन समर्पित केले. याच विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच १४ अक्टोंबर १९५६ रोजी नागपुर च्या पवित्र दीक्षाभूमिला आपल्या पाच लाख अनुयायी सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. म्हणून या दिवसाला दुहेरी महत्व प्राप्त झाले आहे. किती पावन दिवस तो आणि किती पावन ती भूमी, दीक्षाभूमी ! आजही देशाच्या काना कोप-याहून "जय भीम बोलो और दीक्षाभूमी चलो" चे नारे लावत आंबेडकरी जनसमुदाय दीक्षाभूमिला येतो. जयभीम आणि बाबासाहेबांच्या जयघोषांनी सर्व परिसर दुमदुमून जातो. जिकडे तिकडे सभा, भीमस्तुतीची गाणी आणि बुद्ध वंदना तसेच बुद्ध-भीम गीतांनी पूर्ण परिसर पवित्र होऊन जातो.मंगलमय होतो. स्तुपाच्या दर्शनासाठी जनतेची खुप लांब रांग असते ... बाबासाहेबांच्या पदस्पर्षाने पुणित झालेली माती श्रध्देने भाळी लावू...

आठवलेंचं बि-हाड रस्त्यावर

रामदास आठवले, 8-ए, लोधी रोड, खान मार्केट समोर, दिल्ली. मागील अकरा वर्षांपासून असलेला रामदास आठवलेंचा हा पत्ता आता बेपत्ता झाला आहे. शुक्रवार, 18 सप्टेंबरला त्यांच्या दिल्लीतील सरकारी घराचा ताबा सरकारनं निष्ठूरपणे घेतला. आठवलेंच्या घरातील चीज-वस्तू या बेवारश्यासारख्या घराबाहेर ठेवून देण्यात आल्या.(की फेकून देण्यात आल्या). गौतम बुध्दांची मुर्ती, बाबासाहेबांचे छायाचित्र, पुस्तकांचे गठ्ठे, फुलदाण्या, टेबल-खुर्च्या, हे सर्व आठवलेंच्या मालकीचं सामान केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कर्मचा-यांनी घराबाहेर काढलं. एका बाबागडीवर आठवलेंचा रुबाबदार फोटो ठेवून देण्यात आला होता. जणू काही आत्ताच तुम्ही या गाडीने आपला रस्ता पकडा असच काहीसं या सरकारी कर्मचा-यांना सांगायचं होतं. हे सरकारी कर्मचारी म्हणजे हुकमाचे ताबेदार. कोणीतरी 'बड्या' सरकारी बाबूने त्यांना आदेशदिला आणि त्या आदेशाची तामील करायला ते सरसावले. नसता सरकारी कर्मचारी एवढ्या तत्परतेने कामाला लागलेले कोणी पाहिलेत का ? माजी खासदार रामदास आठवलेंना घर खाली करण्यासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याकडून 10 वेळा नोटीस बजावण्यात आली...

मराठी चुंबन 'तिखट'

जोगवा... 18 सप्टेंबरला प्रदर्शीत होणार आहे. याआधीच हा चित्रपट गाजतोय तो मराठी चित्रपटांमध्ये पहिला "किस" सिन असल्यामुळे. या चित्रपटाला 60 नामांकनं मिळालीत तर 37 पारितोषिकं प्रदर्शनाआधिच या चित्रपटाने पटकावली आहेत. मराठी चित्रपट बदलतोय हे श्वास पासून आपण पहात आलोय. गंध, गाभ्रीचा पाऊस,हरिश्चंद्रांची फॅक्टरी, नुकताच प्रदर्शित झालेला रिटा आणि आता जोगवा... या सगळ्या चित्रपटांनी मराठी चित्रसृष्टीला आऊट ऑफ फ्रेम केलं आहे. एका चौकटीत अडकलेला मराठी सिनेमा या चित्रपटांमुळे जगाच्या पटलावर गेला. असं असतांना केवळ एका किसचं दृष्य आहे म्हणून मराठी माध्यमांनी मराठी चित्रपट बोल्ड झालाय म्हणनं कितीसं सोईस्कर आहे. जोगवा तून मांडलेला विषय आपल्या संस्कृतीचे गोडवे गाणा-यांना खरतर एक चपराक आहे. ज्याचा जन्म पुरुष म्हणून झालाय त्याला स्त्रीचा पेहराव करून त्याच्या मनाविरुध्द बायकांचं जिनं जगावं लागतं. त्याच्या भाव, भावनांचा विचार इथल्या समाजाने कधीच केला नाही. केवळ यल्लमाला वाहिला म्हणून त्यानं जोगत्याचंच जिनं जगावं, हे या समाजाला मान्य होतं? त्याविरोधात कधी कोणी बोलायला पुढे सरसावत नाही? कोणी त्यावि...

समितीचे पाय मातीचे हवे

महाराष्ट्रात तिसरी आघाडी एकदाची झाली.तिचं बारसंही काल झालं. "रिपब्लिकन डावी लोकशाही समिती". या समितीतील सगळ्यांनी हातात हात धरून हात उंचावले...आम्ही एकत्र असल्याचे दाखवण्यासाठी... प्रेसवाल्यांना, टिव्हीवाल्यांना फोटो दिले. या तिस-या आघाडीत आहेत, 1)शेतकरी कामगार पक्ष,(त्यांच्याच ऑफिसमधे बसून प्रेस घेतली म्हणून त्यांचे नाव प्रथम) 2)रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एकत्रीत), अजूनही रिपाईच्या पुढे कंस घालावाच लागतो. त्याशिवाय कळत नाही आपण कोणत्या रिपाई विषयी बोलत आहोत ते. अशीच अवस्था कमी जास्त प्रमाणात या आघाडीत सामील झालेल्या पक्ष - संघटनांची आहे. 3)मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, 4)भारतीय कम्युनिस्ट पक्ष, 5)स्वाभिमानी शेतकरी संघटना. 6)समाजवादी पार्टी, 7)जनता दल सेक्युलर, 8)परिवर्तन आघाडी 9)सोशालिस्ट फ्रंट 10)लोक जनशक्ती पार्टी 11)राष्ट्रीय समाज पक्ष 12)समाजवादी जनपरिषद 13)सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष 14)लोक राजनिती मंच 15) लोकभारती आणि 16)लोकसंघर्ष मोर्चा या सोळा पक्षाची मोट बांधण्यात आली आहे. आणखी बरेच पक्ष येवून मिळण्याचे संकेत या समितीने काल दिले आहेत. मात्र हितेंद्र ठाकूर यांच्या वसई व...

ओढ...

ओढ... माणसाला कित्येक गोष्टींची ओढ असते... त्यात घराची ओढ ही काही औरच! माणूस कोणत्याही परिस्थितीत असला, कोणत्याही संकटात सापडला किंवा त्याला काही आनंद झाला तरी त्याला ओढ असते ती घराची. कधी एकदा घरी जातो असं होवून जातं. कोणतीही व्यक्ति घरी आल्यावर घराची दारं त्याचं किंवा तिचं आगत-स्वागत करणार नसतात. घराच्या विटा-मतीच्या किंवा संगमरवरी भिंती आपली विचारपूस करणार नसतात. दारा-खिडक्यांचे पडदे आंगाखांद्यावरुन हात फिरवणार नसतात, की मखमली बिछाना मायेची उब देणार नसतो. खिडक्या कितीही सत्ताड उघड्या करुन ठेवल्यातरी त्या आपल्याशी कोणताच संवाद साधणार नसतात. मनातली घालमेल शेअर करणार नसतात. तरीही माणसाला दगड-विटा-मातीच्या घराची कायम ओढ असते. घरातील वस्तूही आपल्याला जासत वेळ सुखावणा-या नसतात, तरीही घराची ओढ कुणाचीच संपत नाही. कारण या सर्व निर्जीव वस्तूमध्ये आपल्या भावना जोडल्या गेलेल्या असतात. या निर्जीव वस्तूंमध्ये जान येते, जेव्हा त्यांना सजीव हलचालींचा स्पर्ष होतो. मग जिन्याची प्रत्येक पायरीही बोलकी होते. जेव्हा तिथे बसून आपल्या प्रियजनांशी केलेल्या सुख दु:खाच्या गप्पा आठवतात... घरात आल्यावर आई-वडिला...

स्वाईन महाराष्ट्र

किती गेले... आज किती... पुण्याचे किती गेले... ससुन मधलाच पेशंट होता का ? या सारख्या प्रश्नांच्या सरबत्तीने सध्या प्रत्येकाच्या ऑफिसचा रोजचा दिवस सुरु होत आहे. न्यूज चॅनल्सवरतीतर मतदानाची आकडेवारी दाखवावी तशी मृतांची आकडेवारी दाखवत आहेत. वृत्तपत्रांचीही स्थिती वेगळी नाही. एव्हाना आता तुम्हाला कळलेच असेल की कोणत्या रोगाबद्दल मी बोलत आहे. स्वाईन फ्लू... H1N1 विषाणू असलेला हा स्वाईन फ्लू आता महाराष्ट्रात आणि खास करुन पुण्यात चांगलाच घुसला आहे, नव्हे धुमाकूळ घालत आहे. या रोगाच्या भयंकर व्याप्तीमुळे पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीची नकोशी आठवण पुन्हा जागी झाली आहे. हा ब्लॉग लिहण्यास सुरवात केली तेव्हा पुण्यातला 12 वा स्वाईन बळी गेला होता. रिदा शेखच्या मृत्यूने सुरु झालेली ही मालिका थांबयचे नाव घेत नाहीए. पहिला मृत्यू रिदाचा झाल्यामुळे तिचे नाव लक्षात राहिले आहे, आता तर देशभरात 20 पर्यंत मृतांचा आकडा पोहचलाय त्यामुळे बालक, शाळकरी मुले, मध्यमवयीन स्त्री, पुरुष, पुण्यातील , राज्यातील आणि देशातील अशी मृतांची विभागणी केली जात आहे. स्वाईन फ्ल्यू या रोगाने महाराष्ट्रात मात्र दहशतीचे वाताव...

रिपाई ऐक्य...

रिपब्लिकन ऐक्य ! राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने सर्वांच्या उत्सूकतेचा विषय. दलित दलितेतर या सर्वांना रिपाईचे ऐक्य केव्हा होणार या विषयीची उत्सूकता राहिला आहे. सर्व रिपाई नेते एकत्र आले तर राज्याच्या राजकारणात ते नक्कीच काही तरी बदल करु शकतील असा सर्वांना विश्वास वाटतो. खाजगीत बोलतांना इतर पक्षातील मंडळीही कबूल करतात की रिपाई चे सर्व गट एकत्र आले तर भक्कम आशी तिसरी आघाडी उभी राहील. मात्र या शक्यता रिपाईच्या स्थापने पासून आतापर्यंत सत्यात आल्या नाहित. रिपाई ऐक्य हे मृगजळाप्रमाणेच दलित जनतेला भासत आले आहे. मात्र 6 ऑगस्ट रोजी मुंबईच्या बैठकीत जवळपास अर्धशतक दलित नेत्यांनी आपापले गट विसर्जीत करुन रिपब्लिकन ऐक्यात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. रिपब्लिकन ऐक्याचा इतिहास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष त्यांच्या ह्यातीत अस्थित्वात येवू शकला नाही. हे या पक्षाचं सर्वात मोठं दुर्देवं. बाबासाहेबांच्या मजूर पक्षानंतर राज्याच्या राजकारणात रिपाईला आलेले सर्वात मोठे यश हे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या काळात. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत दादासाहेबांच्या नेतृत्वाख...

कभी ना बिते ये चमकिले दिन...

True friends are like mornings, u cant have them the whole day, but u can be sure, they will be there when u wakeup tomorrow, next year and forever किंवा सगळ्या मित्रांच्या वेगवेगळ्या रंगांच्या अस्तीत्वामुळे माझ्या जीवनात अनेक रंग भरले गेले. त्या माझ्या जवळच्या सगळ्या मित्रांसाठी Hapqy Friendship Day. या आणि या सारख्या मेसेजेसनी आज मोबाईलचा ईनबॉक्स भरत होता. ऑगस्ट चा पहिला रविवार म्हणेजे Friendship Day. (हे कोणी सांगितले, कोणी लिहून ठेवले, कोण म्हणालंय या पैकी काहीच माहित नाही.) जेव्हा मी 11 वी - 12 वीत असेल तेव्हा हा 'FD' (संक्षीप्त नामाभीधानच सर्वांना जास्त आवडतात म्हणून आणि लांबलचक लिहायचा मलाही कंटाळा आलाय म्हणून) मला माहित झाला बहूतेक. व्हेलेंटाईन डे प्रमाणे मुलींना प्रपोज करण्याचा आणखी एक बहाण्याचा दिवस. एवढच काय ते या दिवसाचं मला तेव्हा अप्रूप. मात्र जेव्हा हातात मोबाईल खेळू लागला तेव्हा आज जसे एसएसएस येतायेत तसे रोज येऊ लागले, आणि मैत्रीचा दिवस साजरा करण्यासाठी ऑगस्टच्या पहिल्या रविवारची वाट पाहण्याची वेळ उरली नाही. मात्र या मैत्र दिनामुळे सगळ्या मित्रांची आठवण ताजी होत...

आता पँथर हवीच

मानवमुक्तीचा लढा सुरुच ठेवा हे प्रसिध्द विचारवंत आणि दलित पॅंथरच्या संस्थापकांपैकी एक असलेले प्रा. अरुण कांबळे यांचे सोलापूरातील आजचे भाषण. या भाषणातून पुन्हा एकदा प्रा. कांबळे यांच्यातील पॅंथर बोलला असं वाटतंय. संसदीय राजकारणाची पॅंथरला कधीच गरज वाटली नाही. सभागृहामधे जावूनच प्रश्न सुटतात यावर पॅँथरचा विश्वास नव्हता. त्यामुळेच प्रा. कांबळेंनी रिपब्लीकन पुढा-यांच्या पराभवानंतर जनआंदोलनाची गरज आधोरेखीत करुन पँथर संघटनेची आज गरज असल्याचं म्हटलं आहे. आजच्या दलित नेत्यांवरती दलित जनतेचा विश्वास राहिलेला तर नाहीच. परंतू या नेत्यांचे अनुयायी म्हणवून घेणारेही तन-मनाने या नेत्यांच्या बरोबरच आहेत. हे विधान धाडसाचं ठरणारं आहे. कारण दलित जनतेवरील अन्याय अत्याचार थांबत नाहीत, ग्रामीण भागातील दलितांची अडवणूक आणि छळवणूकीचे नवे प्रकार नव्या सरंजामदारांनी (राज्यकर्त्यांनी) शोधून काढले आहेत. या सगळ्या जाचातून दलित जनतेची सोडवणूक करण्यास खंबीरपणे कोणताच तथाकथीत दलित नेता अंगझटकून पुढे सरसावत नाही. या गोष्टींचा दलित जनतेला आणि सामान्य कार्यकर्त्यांना उबग आलाय. यामुळे खरोखरच सुप्त लाट दलित कार्यकर्ते आणि ...

लक्ष्मण अजूनही 'उपरा'

लक्ष्मण माने. 'उपरा' या पुस्तकाने महाराष्ट्रातील साहित्य जगत् ढवळून काढल्यानंतर लक्ष्मण मानेचा 'उपरा'कार लक्ष्मण माने झाले. आता पद्मश्री लक्ष्मण माने. फुले, शाहू, आंबेडकर चळवळीवर विश्वास असणा-य मानेंनी ज्या समाजातून आलो त्यांच्यासाठी काही करायचे ठरविले तेव्हा, "शिक्षण" हेच या समाजाला उन्नत्त करु शकेल हे जाणले आणि त्यांच्या साठी स्वत:च्या मालकीच्या जागेत आश्रम शाळा सुरु केली. या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आश्रमशाळेच्या तीन खोल्या आज पाडण्यात आल्या. सातारा पालिकेने कोर्टाच्या आदेशाने ही शाळा जमीनदोस्त केली असलीतरी या मागे कच्छी आणि बारटक्के असोसिएट्स या बिल्डरांचा हात आहे. सातारा जिल्हातील करंजे येथे वहिवाटीनुसार लक्ष्मण माने यांच्या मालकीच्या जागेत भारतीय भटके विमुक्त संशोधन संस्थेची ही आश्रम शाळा आहे. विशेष म्हणजे शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे या विश्वस्त असलेल्या या शाळेला त्यांच्याच पक्षाच्या ताब्यात असलेल्या पोलीस खात्यांच्या सुरक्षेत पाडण्यात आले. या मुळे शासनापेक्षा बिल्डर भारी भरले आहेत, असंच म्हणावं लागेल. उपरा या पुस्तकात माने यांनी...

मनसेतून 'श्वेतप्रकाश' बाहेर

मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना. लोकसभेच्या निवडणूकी नंतर सामान्य मतदाराने जरी या पक्षाचा गांभीर्य़ाने विचार करयाला सुरुवात केली नसली तरी, राज्यातील शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने आपला नवा - तरुण मतदार या पक्षाकडे आकृष्ट होणार नाही याची वेळोवेळी काळजी घेतांना दिसले. मात्र मागील काही दिवसात मनसेतील प्रमुख पदावरील दोन व्यक्तींची पक्षातून झालेली हकालपट्टी पुढील काळात या पक्षाचा चेहरा कोणता राहणार हे स्पष्ट करणारी ठरली आहे. श्वेता परुळकर यांना त्यांच्या पदावरुन दूर करण्यात आलं. तेव्हा मिडीया शिवाय कोणीच ही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही. कारण श्वेता या काही मास लिडर नव्हत्या. त्यांच्या जाण्याने मनसेला देखील फार मोठा धक्का बसला नाही की त्या शिवसेनेत गेल्यामुळे सेनेचाही एखादा गड मजबूत झाला असंही काही नाही. शिवसेनेला त्यातल्यात्यात एकच जमेची बाजू की मनसेने चेहरा दिलेली माणसेच आता मनसेच्या विरोधात बोलायला त्यांना मिळाली. त्यामुळे सेनेला आता त्यासाठी जास्त शक्ती खर्च करण्याची गरज उरलेली नाही. काल (21 जूलै) रोजी औरंगाबादच्या प्रकाश महाजनांनी मनसेतून अपम...